Breaking News

राज्य सरकारचा पिंडदान करून केला निषेध

नवी मुंबई : बातमीदार

महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यास पुरते अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा पिंडदान करत मनसे नवी मुंबईने अनोख्या पध्दतीने निषेध व्यक्त केला.

कोरोनाजन्य परिस्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरलेले आहे. वेळेवर आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेड उपलब्ध होत नसल्याने अनेकांना मृत्यूस सामोर जावे लागत आहे. रॅमिडिसिव्हर व टोसिलिजम एब सारखे कोरोना रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढणारे औषध मिळेनासे झाले आहे. या औषधांचा काळाबाजार सुरू आहे. हे औषध उपलब्ध कसरून देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. खासगी रुग्णालयांवर सरकारचा वाचक उरलेला नसल्याने उपचारांच्या नावाखाली लूट चालवली जात आहे. मृतदेह अदलाबदल होण्याचे राज्यातील प्रकार वाढले आहेत. रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत अशा विविध बाबी हाताळण्यात व सुरळीत करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप या वेळी मनसेकडून करण्यात आला. व पिंडदान करून विधिवत श्राद्ध घालुन निषेध नोंदवण्यात आला. या वेळी मनसे शहर सचिव सचिन आचरे, संदीप गलुगडे, विशाल चव्हाण, श्याम वाघमारे, आकाश पोतेकर, शेखर गावडे, अरुण पाटील, प्रणय दरपाळ, देवानंद खिल्लारी, धीरज शिंदे आदी उपस्थित होते.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply