Breaking News

रायगडात सरासरी 60 टक्के मतदान

अलिबाग ः प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (दि. 23) मतदानप्रक्रिया शांततेत झाली. सायंकाळी 6 वाजेपर्यंत 58.06 टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिवसेनेचे अनंत गीते, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यासह 16 उमेदवारांचे राजकीय भवितव्य तिसर्‍या टप्प्यातील निवडणुकीत मतदान यंत्रात बंद झाले आहे.

रायगडात भरघोस मतदानाची परंपरा याही वेळी जपली गेली. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येत होता. दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला. महाड तालुक्यातील आमशेत येथील 110 वर्षांच्या गंगुबाई विठ्ठल चव्हाण आणि कांबळेतर्फे बिरवाडी येथील 107 वर्षांच्या सुलोचना गोविंद देशमुख या वृद्ध महिलांनी मतदान केंद्रावर जाऊन हक्क बजावला. त्याचप्रमाणे मंगळवारी आपला विवाह असतानाही तीन नवरदेवांनी आधी मतदानाला प्राधान्य दिले. यात अलिबाग तालुक्यातील नवखार येथे प्रवीण पाटील, वायशेत येथे रूपेश पाटील आणि मुरूड तालुक्यातील बारशीव येथील तुषार सचिन कासार यांचा समावेश होता.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply