Sunday , September 24 2023

भाजपपाठोपाठ शिवसेनेची पहिली यादी जाहीर

मुंबई : प्रतिनिधी

मित्रपक्ष भाजपपाठोपाठ शिवसेनेने लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी शुक्रवारी (दि. 22) जाहीर केली. शिवसेनेने आपल्या कोट्यातील 23 पैकी पालघर आणि सातारा वगळता सर्व मतदारसंघांतील उमेदवार घोषित केले आहेत.

शिवसेनेने जाहीर केलेल्या 21 लोकसभा उमेदवारांच्या यादीत अपेक्षेप्रमाणे तुरळक अपवाद वगळता सर्वच जागांवर विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळाली आहे. सातारा आणि पालघर या दोन जागांबाबत 24 तारखेला आयोजित युतीच्या महामेळाव्यात उमेदवारांची घोषणा होईल; तर उस्मानाबाद मतदारसंघामधून विद्यमान खासदार रवी गायकवाड यांच्या जागी ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

मतदारसंघनिहाय उमेदवारांची नावे

द. मुंबई : अरविंद सावंत, द. मध्य मुंबई : राहुल शेवाळे, उ. पश्चिम : गजानन कीर्तिकर, ठाणे : राजन विचारे, कल्याण : श्रीकांत शिंदे, रायगड : अनंत गीते, रत्नागिरी सिंधुदुर्ग : विनायक राऊत, कोल्हापूर : संजय मंडलिक, हातकणंगले : धैर्यशील माने, नाशिक : हेमंत गोडसे, शिर्डी : सदाशिव लोखंडे, शिरुर : शिवाजीराव आढळराव : पाटील, औरंगाबाद : चंद्रकांत खैरे, यवतमाळ : वाशिम : भावना गवळी,  बुलडाणा : प्रतापराव जाधव, रामटेक : कृपाल तुमाने, अमरावती : आनंदराव अडसूळ, परभणी : संजय जाधव, मावळ : श्रीरंग बारणे, हिंगोली : हेमंत पाटील, उस्मानाबाद : ओमराजे निंबाळकर.

Check Also

महाडच्या गोमुखी आळीतील शतकोत्तर दशकपूर्ती गणेशोत्सव

महाड ः रामप्रहर वृत्त ऐतिहासिक व सामाजिक क्रांतीचे ठिकाण म्हणून शिवकाळापासून नोंद झालेल्या महाड शहरातील …

Leave a Reply