Breaking News

विंडीजविरुद्ध कसोटीत ईशांत, जडेजा चमकले

गयाना : वृत्तसंस्था

ईशांत शर्माच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर पहिल्या कसोटीत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. दुसर्‍या दिवसाअखेर वेस्ट इंडिजने आठ गड्यांच्या मोबदल्यात 189 धावा केल्या आहेत. पहिल्या डावात विंडीजचा संघ अद्याप 108 धावांनी पिछाडीवर आहे. दुसर्‍या दिवशी जडेजाने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत सन्माजनक धावसंख्या उभारून दिल्यानंतर ईशांत शर्माने पाच बळी घेत सामन्यात भारताचे पारडे जड केले आहे.

प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य राहणे आणि रवींद्र जडेजाच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सर्व बाद 297 धावांची मजल मारली. रहाणेने 81, तर जडेजाने 58 धावांचे योगदान दिले. भारताने दिलेल्या 297 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना विंडीजने सावध सुरुवात केली. सलामीवीर ब्रेथवेट आणि कँपबेल यांनी 36 धावांची भागीदारी केली. मोहम्मद शमीने कँपबेलला 23 धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर ईशांत शर्माने क्रेग ब्रेथवेटला 14 धावांवर माघारी धाडले. जडेजाने शमर ब्रुक्सला 36 धावांवर बाद केले, तर  ब्रावोला जसप्रीत बुमराहने 18 धावांवर पायचीत केले.

रोस्टन चेजने विडींजकडून चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, मात्र ईशांत शर्माने त्याला 48 धावांवर बाद करत विंडीजला खिंडार पाडले. शाय होप (24), हेटमायर (35) आणि केमर रोच (0) आपल्या लौकिकास साजेशी खेळू करू शकले नाहीत. दुसर्‍या

दिवसाअखेर कर्णधार जेसन होल्डर 10 धावांवर खेळत आहे. भारताकडून शर्माने पाच बळी घेतले, तर बुमराह, शमी आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. दरम्यान, दुसर्‍या दिवशी खेळाला सुरुवात झाल्यानंतर पंत झटपट माघारी परतला. त्यानंतर भारताचा डाव लगेच कोसळणार असे वाटत होते, पण जडेजाने तळाच्या फलंदाजांना सोबत घेत खिंड लढवली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply