पनवेल ः वार्ताहर
पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ‘ब’चे सभापती आणि प्रभाग क्र. 15, खांदा कॉलनीमधील कार्यतत्पर नगरसेवक संजय भोपी यांनी पनवेल महानगरपालिकेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या महासभेत खांदा कॉलनी विभागातील कोविडबाधित रुग्णांना उपचारार्थ बेड मिळविण्यासाठी होत असलेल्या त्रासाची जाणीव करून दिली. या वेळी त्यांनी खांदा कॉलनी विभागात तातडीने कोविड रुग्णालय सुरू करण्याची आग्रही मागणी केली. सोबतच परिसरातील जनसेवा आश्रम या वृद्धाश्रमातील सर्व वयस्कर नागरिक तसेच आश्रमाशी संबंधितांची एकत्रितपणे रॅपिड अँटिजेन चाचणी करून सर्व बाधितांना पनवेल महापालिकेच्या वतीने मोफत उपचार उपलब्ध करून देण्याची मागणीही त्यांनी केली.