पनवेल : रामप्रहर वृत्त
गिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विकासाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
या पार्श्ववभूमीवर त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची गुरुवारी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. या वेळी आत्माराम हातमोडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गिरवले गावाचा सर्वांगीण विकास, शेतकरी, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी भाजपाची विकासाची विचारधारा योग्य असल्याचा विश्वास व्यक्त करत हा निर्णय घेण्यात आला. गिरवले गावाच्या विकासाला नवी दिशा देणारा आणि शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी हा पक्षप्रवेश महत्त्वाचा ठरणार आहे.
दरम्यान पनवेल महापालिकेचेमाजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, नगरसेवक बबन मुकादम यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा जाहीर पक्ष प्रवेश सोहळा नुकताच झाला होता. या पक्ष प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची ताकद अधिक मजबूत झाली आहे.
Check Also
यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा
यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …
RamPrahar – The Panvel Daily Paper