Breaking News

एल अॅण्ड टी कंपनीकडून शेतकर्यांना नुकसानभरपाई

पोलादपूर : प्रतिनिधी – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणादरम्यान कशेडी घाटातील धामणदिवी गावालगत महामार्गावर 9 आणि 10 जुलै रोजी दरड कोसळल्यानंतर त्याचा मलबा एल अ‍ॅण्ड टी ठेकेदार कंपनीकडून लगतच्या शेतकर्‍यांच्या शेतजमिनींमध्ये टाकण्यात आला होता. या संदर्भात ठेकेदार कंपनीकडून धामणदिवी येथील नऊ दरडग्रस्त शेतकर्‍यांना नुकसानभरपाईचे सानुग्रह वाटप करण्यात आले. लवकरच शेतजमिनीचीही साफ सफाई विनामूल्य करून देण्यात येणार असून, सरकारी मदतीसाठी भूवैज्ञानिक स्तरावर सर्व्हेक्षणाची गरज असल्याचे या वेळी निवासी नायब तहलीलदार समीर देसाई यांनी सांगितले.

पोलादपूर तालुक्यातील धामणदिवी येथे यंदा पावसाळ्यामध्ये मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळून तब्बल 20 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. दरडीचा मलबा हटविताना तो धामणदिवीतील शेतकर्‍यांच्या शेतजमिनीमध्ये टाकण्यात आला होता. तत्कालीन प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या उपस्थित प्रशासनाला शेतकर्‍यांना भरपाई आणि दरडीच्या संभाव्य धोक्यापासून ग्रामस्थांना व त्यांच्या घरांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आदेश दिले होते. यानंतर प्रशासनाने दरडीच्या धोक्यापासून स्थलांतर करण्याची गरज असल्याचा अहवाल जिल्हाधिकार्‍यांना सादर केला.

यानंतर धामणदिवी येथे नऊ शेतकर्‍यांना प्रतिगुंठा पाचशेप्रमाणे 55 हजार 900 रुपयांचे सानुग्रह नुकसानभरपाईचे वाटप करण्यात आले. या वेळी सरपंच शांताराम पारदुले आणि मंडल अधिकारी मुंडेकर तसेच एल अ‍ॅण्ड टी ठेकेदार कंपनीचे देसाई उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply