Thursday , March 23 2023
Breaking News

गव्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

कोल्हापूर ः प्रतिनिधी

आजरा तालुक्यातील सोहाळे येथील एका महिलेवर काल सकाळच्या सुमारास एका गव्याने हल्ला केला. पाठीत शिंग घुसल्याने व डाव्या पायातून हाड बाहेर आल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हौसाबाई परसू पेडणेकर (55) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गावाजवळ येऊन वन्यप्राणी आता माणसांवर हल्ले करू लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार हौसाबाई सकाळी उठून घरातील जनावरांचे शेण काढणे, ते उकिरड्यात टाकणे अथवा शेणी लावण्याचे काम नियमित करतात, मात्र आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्या शेणी लावण्याकरिता गावाच्या प्रवेशद्वाराजवळील संत्सग भवन परिसरात गेल्या होत्या. या वेळी बाचीच्या जंगलातून आलेल्या गव्याने हौसाबाई यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पेडणेकर गंभीर जखमी झाल्या होत्या. पाठीत शिंग घुसल्याने रक्तस्त्राव मोठा झाला. तर पायाचे हाड फ्रॅक्चर झालेल्या स्थितीत आरडा-ओरड्यामुळे जमा झालेल्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने उपचारासाठी गडहिंग्लज येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले, मात्र उपचार सुरू असतानाच त्या मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Check Also

पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागताचा उत्साह

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेलमध्ये गुढीपाडव्यानिमित्त नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आयोजित शोभायात्रेत लहान मुलांसह महिला, …

Leave a Reply