नवी दिल्ली ः देशातील शाळा 15 ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने उघडणार असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत. आधी मोठ्या वर्गांच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरू करण्यात येतील. याबाबतची मानक कार्यप्रणाली (एसओपी) राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायची आहे. शाळांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व आरोग्याची काळजी घेणे ही शाळांची जबाबदारी असणार आहे तसेच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असेल. पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात. विद्यार्थ्यांना रोजच हजर रहावे लागेल असे नाही. त्यात मुभा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा, असेही यात नमूद करण्यात आले आहे.
Check Also
कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा
कामोठे : रामप्रहर वृत्तरयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता दहावीच्या …