पनवेल : रामप्रहर वृत्त – कोरोना विषाणुच्या संसर्गातून पसरत चाललेल्या कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या लाटेने जगभरातील शाळा खरं तर बंद करण्यात आल्या होत्या. परिक्षा रद्द झाल्या लॉकडाऊन सुरू झाला सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. परंतु या बिकट परिस्थितीतही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, शिक्षणात खंड पडू नये म्हणून केवळ एक आठवड्याात संपूर्ण तयारीनिशी चांगू काना ठाकूर (सीकेटी) इंग्रजी माध्यमाने शैक्षणिक वर्ष 2020-21 च्या दहावीच्या बॅचचे ऑनलाई वर्ग सुरू केले.
23 मार्चला लॉकडाऊन सुरू झाला, आणि दि. 28, 29 व 30 रोजी दहावीच्या शिक्षकांना ऑनलाइन ट्रेनिंग देण्यात आले. नंतर 1 एप्रिलपासून इयत्ता दहावीचे वर्ग ही ऑनलाइन सुरू झाले. इतक्या कमी कालावधित सुरू झालेले हे वर्ग म्हणजे एक आश्चर्यच म्हणावे लागेल. पुढील काही दिवसात सर्वच शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आणि इयत्ता पाचवी ते नववीचे वर्गही 22 एप्रिल पासून सुरू झाले. याचवेळी विद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे इयत्ता पाचवी व सहावी करिता नैतिक मूल्याशिक्षणाचे 10 दिवसांचे शिबिर घेण्यात आले.
मे महिन्याच्या सुट्टीनंतर परत एकदा शिक्षक जोमाने कामाला लागले. शाळेचे मुख्याध्यापक चव्हाण सर तसेच तंत्रज्ञान विभागातील शिक्षकांच्या मार्गदर्शनाने ऑनलाइन शिक्षणाचे प्रशिक्षण शिक्षकांनी आत्मसात केले. पीपीटी प्रेझेंटेशन, गुगल फॉर्मद्वारे प्रश्नावली, शब्दभिंती अशा विविध मार्गांनी शिक्षणात रंजकता आणल्याने विद्यार्थ्यांनाही हे शिक्षण आवडू लागले. फक्त यातच समाधान न मानता वेगवेगळे उपक्रम, स्पर्धा तसेच ऑनलाइन समारंभाचे आयोजन करण्यात आले.
1 मे 2020 महाराष्ट्र दिनी इतिहास अभ्यासक श्रीनिवास हिंगे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. 21 जून योग दिनी श्री. रामचंद्र जोशी या योगतज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 5 जुलै 2020 रोजी गुरूपौर्णिमा उत्सव संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक श्री. संतोष चव्हाण सर यांनी विद्यार्थ्यांना गुरूपदेश दिला. 27 जुलै रोजी कोरोना संबंधित नाविन्यपूर्ण विषयांवर चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. 15 ऑगस्ट 2020 स्वातंष्य दिना निमित्त राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा झाल्या.
5 सप्टेंबर 2020 रोजी शिक्षक दिना निमित्त घोषवाक्य स्पर्धा आणि मढहरपज्ञ ींहश ढशरलहशीफ या विषयावर एक मिनिट व्हिडीओ स्पर्धा घेण्यात आली. शिक्षक दिनानिमित्त चेतना पब्लिकेशनतर्फे आयोजित केलेल्या ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेत नववी, दहावी च्या विद्यार्थ्यांनी चांगलीच बाजी मारली.
14 सप्टेंबर 2020 रोजी हिंदी दिवस समारंभ संपन्न झाला. या निमित्ताने इ. 5 वी ते 7 वी च्या विद्यार्थ्यांकरीता हिंदी कविता गायन आणि इ. 8 वी ते 10 वी करिता हिंदी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या.
2 ऑक्टोबर 2020 गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त इयत्ता पाचवी, सहावी करिता चित्रकला स्पर्धा, इयत्ता सातवी, आठवी करिता कथा कथन स्पर्धा आणि इयत्ता नववी, दहावी करिता. वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. या नंतर ही 15 ऑक्टोबर या वाचन प्रेरणा दिन म्हणजेच भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृती दिनी मी वाचलेल्या पुस्तकाचा सारांश ‘या विषयावर लेखन आणि वाचन स्पर्धा घेण्यात येणार आहे.’
डिस्कव्हरी चॅनल, दैनिक लोकमत आणि बायजु अॅप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात येणार्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत विद्यार्थी मोठ्याा संख्येने सहभागी होणार आहेत.
संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, अध्यक्ष अरूणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, सचिव डॉ. एस. टी. गडदे संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने ऑनलाइन विद्यालय सुरळीत सुरू आहे. अशा प्रकारे येणार्या कालावधीत विद्यालय प्रत्यक्ष कधी सुरू होईल हे अनिश्चित असले तरी शालेय शिक्षण आणि विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती या करिता चांगू काना ठाकूर विद्यालय इंग्रजी माध्यमाचे शिक्षक, मुख्याध्यापक संतोष चव्हाण यांच्या उत्कृष्ट नियोजनाने आणि पर्यवेक्षिका निरजा अदुरी यांच्या मार्गदर्शनाने अथक प्रयत्न करत आहेत. याबद्दल पालकवर्गाकडून अत्यंत समाधान व्यक्त करण्यात येते आहे.