Breaking News

आई तुझ देऊळ फेम डान्सर सचिन ठाकूर यांची कार पुन्हा एकदा अज्ञात व्यक्तीने जाळली

उरण : बातमीदार
आई तुझ देऊळ हे गीत संपूर्ण देशभरात गाजत आहे या गीताचे प्रसिद्ध कलाकार, डान्सर / नृत्य दिर्ग्दर्शक , श्री रत्नेश्वरी कलामंच चे संचालक , रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील जसखार गावचे सुपुत्र राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सचिन लहू ठाकूर यांची दिनांक
5 जानेवारी 2023 रोजी जसखार गावात रूम नंबर 493,रोड जवळ, जसखार येथे उभी असलेले फोर व्हीलर वाहन मारुती सुझूकी सिलेरियो, कार नंबर एमएच 46 बीव्ही 2266 हे वाहन अज्ञात व्यक्तीने जाळून टाकले होते. त्यावेळी या वाहनाचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते तेव्हा सचिन ठाकूर यांनी त्वरित न्हावा शेवा पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदविला होता, मात्र पोलिस प्रशासनाला तो आरोपी पकडण्यात त्यावेळी अपयश आले. त्यानंतर जवळ जवळ सात महिन्यांनी परत तशीच सेम घटना जसखार गावातील सचिन ठाकूर यांच्या सोबत घडली असून 7 ऑगस्ट 2023 रोजी रात्री 1 वाजून 20 मिनिटांनी सचिन ठाकूर यांची रूम 493, जसखार गाव येथे असलेले मारुती सुझुकी सेलेरियो कार नंबर चक46इत 2266 मागच्या वेळी ज्या पद्धतीने जाळली त्याच पद्धतीने पुन्हा जाळली. सचिन ठाकूर यांचे हे दुसर्‍यांदा वाहन जळाल्याने जसखार गावातील वाहनाच्या व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वाहनाला लागलेली आग सचिन ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांनी तसेच मित्रांनी लगेच विझविली. व पुढे होणारा मोठा अनर्थ टळला.जवळच सीएनजी टँक होता. व आजूबाजूला रिक्षा व इतर वाहने होती. मोठा स्फोट हाऊन इतर वाहनांना आग लागल्याची शक्यता होती. मात्र आग विझविण्यात आली. यात सुदैवाने कोणतेही जीवितहानी झाली नाही. अज्ञात व्यक्तीने वाहनाला आग लावल्याने या वेळीही सचिन ठाकूर यांना प्रचंड आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.

आरोपी सापडले नसल्याने माझ्या जीवितास खूप मोठा धोका आहे. तो आरोपी पुन्हा असे कृत्य करू शकतो. त्यामुळे पोलिसांनी या गंभीर घटनेची त्वरित दखल घेउन आरोपी शोधून त्याच्यावर कडक कारवाई करावी.
-सचिन ठाकूर, जसखार ग्रामस्थ, प्रसिद्ध कलाकार

घडलेल्या घटनास्थळी जाऊन झालेल्या नुकसानीचे पाहणी करून सदर अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. लवकरच विविध पुराव्याच्या साहाय्याने आरोपीला पकडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सदर घटनेचा तपास शीघ्र गतीने आम्ही करीत आहोत.
-बबन सोनावणे, पोलीस उपनिरीक्षक, न्हावा शेवा पोलीस स्टेशन

Check Also

उरण विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांचा होणार विकास

आमदार महेश बालदी यांच्या मागणी व पाठपुराव्याने 40 कोटी रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यता उरण ः …

Leave a Reply