Breaking News

रावे येथे कोरोना योद्ध्यांचा सन्मान

पेण : वार्ताहर

तालुक्यातील दुर्गम भागात कोरोना प्रादुर्भावाच्या काळात दिवसरात्र मेहनत घेऊन रुग्णांची सेवा करणार्‍या व्यक्तींचा नुकताच रावे येथे ग्रामस्थ मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.

श्री रायबादेवी मंदिराच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमास गाव पंच कमिटीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चंदन पाटील, माजी अध्यक्ष संतोष पाटील, राजा पाटील, मनोहर टावरी, हिरामण पाटील, धनाजी पाटील, जनार्दन पाटील, गजानन पाटील, सत्यवान पाटील, प्रभाकर पाटील,  निवृत्ती पाटील, नितीन पाटील, धनाजी पाटील, विश्वनाथ पाटील, राणा पाटील, गजानन पाटील, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. संचित गावंड, डॉ. मेघा पाटील, डॉ. प्रीतम पाटील, डॉ. दीपक विश्वास, त्याचबरोबर श्री रायबादेवी मेडिकल स्टोअर्सचे मालक गजानन पाटील, आशा वर्कर पुष्पलता पाटील, संगीता पाटील, दिपू पाटील, अमृता पाटील यांचा कोरोना योद्धा म्हणून दसर्‍याचे औचित्य साधून सन्मान करण्यात आला.

त्याचप्रमाणे पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे उपाध्यक्ष तथा साप्ताहिक रायगड शिव सम्राटचे संपादक रत्नाकर पाटील यांचा सत्कार केला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण पाटील यांनी केले.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply