Breaking News

रायगडात 126 नवे कोरोना रुग्ण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात नव्या 126 कोरोना रुग्णांची आणि तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवारी (दि. 27) झाली, तर दिवसभरात 170 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 75 व ग्रामीण 22) तालुक्यातील 97, पेण सहा, खालापूर व माणगाव प्रत्येकी पाच, अलिबाग चार, उरण व कर्जत प्रत्येकी दोन, माणगाव तीन आणि सुधागड व पोलादपूर तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत रुग्ण अलिबाग दोन व पनवेल तालुक्यात एक असे आहेत. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 53,441 आणि मृतांची संख्या 1533 झाली आहे. 50,351 जण कोरोनामुक्त झाल्याने 1557 विद्यमान रुग्ण आहेत.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply