Breaking News

पालीत दिव्यांगांना मिळाला रोजगार

वडापाव व टी स्टॉल सेंटरचे उद्घाटन

पाली : प्रतिनिधी

दिव्यांग बांधवांना सर्वांगीण दृष्ट्या सक्षम व सधन करण्याच्या उद्देशाने शासन प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. साई-सखा दिव्यांग बचत गटाच्या माध्यमातून पालीत उभारलेल्या वडापाव व टी स्टॉल सेंटर नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे चार दिव्यांगांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

सुधागड तालुका गटविकास अधिकारी गजानन लेंडी यांच्या प्रेरणेनेतून हा स्टॉल उभारण्यात आला आहे. त्याचे उद्घाटन सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावर, गट विकास अधिकारी गजानन लेंडी, महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी संघटना राज्याध्यक्ष साईनाथ पवार व जागृती अपंग कल्याणकारी संस्थेचे  संस्थापक अध्यक्ष शैलेश सोनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.  या कार्यक्रमास बाबासाहेब देशमुख, अनिल जोशी, वैभव पिंगळे, अशोक दाभाडे, दिलीप जोशी व सखाराम कुडपणे आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply