Breaking News

नेत्रतपासणी शिबिरास पनवेलमध्ये प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

वीर वुमन फाऊंडेशन, श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ आणि लक्ष्मी आय इन्स्टिट्युटच्या वतीने पनवेलमधील श्री जैन श्वेतांबर स्थानक येथे नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवारी (दि. 2) करण्यात आले होते. त्यास प्रतिसाद लाभला.

या वेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक अनिल भगत, नितीन पाटील, राजू सोनी, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष चिन्मय समेळ, पार्वती शेरावत, वीर वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर, उपाध्यक्ष श्रुती निसार, सेक्रेटरी सीमा जैन, अर्चना सोनी, सदस्य नम्रता बांठिया, पूनम जैन, अल्का जैन, कीर्ती मुणोथ, सिंपल जैन, डॉ. सुहास हळदीपूरकर, डॉ. परेश म्हात्रे, डॉ. प्रमिला दास आदी उपस्थित होते. या वेळी वीर वुमन फाऊंडेशनच्या अध्यक्ष अर्चना ठाकूर यांनी शिबिरासंदर्भात माहिती दिली. परिसरातील नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply