मुरुड : प्रतिनिधी
यशवंतनगर नांदगाव येथील श्री छत्रपती शिवाजी नूतन विद्यालयातील दहावीच्या 95 विद्यार्थ्यांना उसरोली ग्रामपंचायतीकडून सरपंच मनीष नांदगावकर यांच्या हस्ते मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करण्यात आले.
सरपंच नांदगावकर यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सागर राऊत यांनी केले. उपसरपंच महेशकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्या समीना जुबेर घलटे, शाळेचे चेरमन फैरोझ घलटे, प्रतीक पेडणेकर, सागर राऊत, योगेश पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी महेश अमृते, अनंत बुल्लू आदी यावेळी उपस्थित होते. मुख्याध्यापक चिंतामणी जोशी यांनी आभार मानले.