Breaking News

पनवेल तालुक्यात 238 नवीन रुग्ण; दोघांचा मृत्यू; 242 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

पनवेल तालुक्यात बुधवारी (दि.19) कोरोनाचे 238  नवीन रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर 242 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पनवेल महापालिका हद्दीत दिवसभरात 175 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा  मृत्यू झाला आहे तर 189 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. पनवेल ग्रामीणमध्ये 63 नवीन कोरोनाबाधित रूग्णांची नोंद झाली असून 53 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी पाठवण्यात आले आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात नवीन पनवेल सेक्टर 5 गुरुकृपा सोसायटी आणि कामोठे सेक्टर 17 शिव कल्पतरू आर्केड येथील व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत कळंबोलीत 29 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1733 झाली आहे. कामोठेमध्ये 31 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 2044 झाली आहे. खारघरमध्ये 36  नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णाची संख्या 1844 झाली आहे.

तसेच नवीन पनवेलमध्ये 47 नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 1742 झाली आहे. पनवेलमध्ये 27 नवीन रुग्ण आढळल्याने  तेथील रुग्णांची संख्या 1650 झाली आहे. तळोजामध्ये पाच नवीन रुग्ण आढळल्याने तेथील रुग्णांची संख्या 556 झाली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात एकूण 9569 रुग्ण झाले असून 7975 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 83.34 टक्के आहे. 1347 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 247 जणांचा मृत्यू झाला आहे.

उरण तालुक्यात 15 नवे रुग्ण

उरण : तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 15 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्यू तर 21 रुग्ण बरे झाले आहे. आढळलेल्या रुग्णांमध्ये गणपती मंदिर जवळ भेंडखळ दोन, बापूशेठ वाडी, सुरकीचापाडा करंजा, धसाखोशी खोपटा, श्रीयोग करंजा, खंडोबा मंदिर सोनारी, आवरे शंकर मंदिरजवळ, जेएनपीटी, द्रोणागिरी बोकडवीरा, भेंडखळ, नवापाडा करंजा, साईगणेश नागाव, मुळेखंड तेलीपाडा, नगाव येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तर चीर्ले बाळकृष्णा मंदिरजवळ येथे एक रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

महाडमध्ये 22 जणांना लागण

महाड : तालुक्यात बुधवारी कोरोनाचे 22 नवीन रुग्ण आढळून आले आहेत, 13 जनांनी कोरोनावर मात केली असुन, एकाचा मृत्यू झाला आहे. आढळलेल्या रुग्णांत दासगाव चार, अप्परतुडील दोन, चांढवे दोन, साईद्वारका अपा.शिरगाव, वस्तुश्री बिल.गोमुखेआळी, इंद्रायनी निवास नवेनगर, लक्ष्मी आर्केड दस्तुरीनाका, अभिषेक बिल.जुनापोस्ट, भोईआळी दासगाव, माने बिल.नवेनगर, व्हाईटहाऊस काकरतळे, बिरवाडी, श्रीशारदा सदन बिरवाडी, शारदावसंत बिल.कोटेश्वरीतळे, श्रीनाथनगर एमजी रोड, जुई अपा.कोटेश्वरीतळे, तनिश्क अपा.शिरगाव येथे प्रत्येकी समावेश आहे.

रोहा तालुक्यात 11 नवे बाधित

रोहा : तालुक्यात बुधवारी 11 कोरोना बाधित व्यक्ती आढळलेे आहेत. तर 35 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आढळलेल्या रुग्णांत कोलाड, महादेववाडी धाटाव, हरी निवास बंगळी आळी, खारी खारगाव, सहकारनगर भुवनेश्वर, गायत्रीनगर भुवनेश्वर, एमआयडीसी धाटाव, श्रद्धा सबुरी अपार्टमेंट वरसे, बोरघर पो. वरसे, राधाकृष्ण कॉम्प्लेक्स सेवादल आळी, नागोठणे कोळिवाडा येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

कर्जतमध्ये 10 कोरोना पॉझिटिव्ह

कर्जत : तालुक्यात बुधवारी 10 नवे कोरोना बाधित आढळले आहेत. आढळलेल्या रुग्णांत अमिरा पॅलेस, मुद्रे खुर्द नानामास्तर नगर, भोईरवाडी, कोतवाल नगर, दहिवली संजय नगर, कडाव नजीकच्या धुळे वाडी, नेरळ हेटकर आळी, कर्जत, शेलू, नेरळ बोपेले येथे प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

नवी मुंबईत 325 जणांना संसर्ग

नवी मुंबई : बातमीदार

नवी मुंबईत बुधवारी 325 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बाधितांची एकूण संख्या 21 हजार 798 तर 471 जण कोरोनामुक्त झाल्याने बरे झालेल्यांची संख्या 18 हजार 001 झाली आहे. बुधवारी पाच जणांचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या 520 झाली आहे. तीन हजार 277 रुग्ण उपचार घेत आहेत.

योग्य जनजागृतीमुळे नागरिक देखील अँटिजेन टेस्टसाठी पुढे येऊ लागले आहेत. त्याचा परिणाम म्हणून नवी मुंबईने एक लाख चाचण्या पूर्ण केल्या आहे. नवी मुंबईतील विभागवार आकडेवारी पाहता बेलापूर 50, नेरुळ 54  वाशी 27, तुर्भे 21, कोपरखैरणे 48, घणसोली 52, ऐरोली 56, दिघा 17 इतके रुग्ण आढळले.

रायगड पोलीस दलातील 249 जणांना कोरोनाची लागण

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड पोलीस दलातील 249 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 166 जण कोरोनावर मात करून बरे झाले आहेत, तर 81 जणांवर सध्या अलिबाग पोलीस मुख्यालयातील विशेष कोविड केअर सेंटर आणि नेरूळच्या डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रायगड जिल्हा मुंबईपासून जवळ आहे. त्यामुळे कोरोनाबाबत जास्त काळजी घेतली जात होती. तरीदेखील जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सुमारे 22 हजार झाली आहे. जिल्ह्यातील शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांच्या अँटिजेन चाचण्या करण्यात येत आहेत. यात अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. रायगड पोलीस दलातदेखील आतापर्यंत 249 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजीत पाटील यांच्यासह रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा दैनंदिन आढावा घेत आहेत.

रायगड पोलीस दलातील कर्मचारी, अधिकारी यांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. लागण झालेल्याना अलिबाग पोलीस मुख्यालयातील सीसीसीमध्ये ठेवले जाते. दिवसातून दोन वेळा डॉक्टर त्यांना तपासतात. ज्यांना जास्त त्रास जाणवत असतो त्यांना डी. वाय. पाटील रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे चिंताजनक स्थितीत रुग्ण जाण्यापासून आपण रोखले आहे. तसेच मी, अप्पर पोलीस अधिक्षक, खालापूर डीवायएसपी हे स्वतः डॉक्टर असून आम्ही सर्व रुग्णाच्या संपर्कात राहून त्याचे मनोधैर्य उंचावण्यास प्रयत्न करीत आहोत.

– अनिल पारस्कर, जिल्हा पोलीस अधीक्षक

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply