Breaking News

कनिका वास्तव्यास राहिलेल्या हॉटेलमध्ये होते दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

बॉलीवूडची प्रसिद्ध गायिका कनिका कपूर हिला करोनाची लागण झाल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाने 100 अतिरिक्त पथके तयार केली आहेत, पण भारताच्या दौर्‍यावर आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाची डोकेदुखी आता जास्त वाढली आहे. कारण कनिका लखनौमध्ये ज्या हॉटेलमध्ये राहिली होती तिथेच दक्षिण आफ्रिकेचा संघ राहीलेला होता. त्यामुळे आता त्यांच्या संघात चिंतेचे वातावरण निर्माण

झाले आहे.

जेव्हापासून कनिका कपूर करोना पॉझिटिव्ह असल्याचं कळले तेव्हापासून अनेक गोष्टी नव्याने समोर येत आहेत. देशभरात तिच्या नावाचीच चर्चा होताना दिसत आहे. सध्या कनिका इस्पितळात असून तिच्यावर योग्य ते उपचार केले जात आहेत.

कनिका कपूर लंडनहून लखनौ येथे आली होती. त्यावेळी कनिका ज्या हॉटेलमध्ये थांबली होती, तिथेच दक्षिण आफ्रिकेचा संघ वास्तव्यास होता. त्यामुळे आता या संघाच्या टेन्शनमध्ये भर पडली आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ लखनौ येथून कोलकाता येथे गेला होता. त्यामुळे आता लखनौबरोबर कोलकाता विमानतळावरही खबरदारीचे उपाय घेण्यात येत आहेत.

सध्या कनिकावर संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स येथे उपचार सुरू आहेत. इस्पितळाचे डायरेक्टर आर.के. धीमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला आवश्यक त्या सर्व सुविधा दिल्या जात आहेत, पण कनिकाचे नखरे काही थांबत नाहीत, असे दिसत आहे.

कनिकाने आयोजित केलेल्या पार्टीला उपस्थित राहिलेल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचण्याचा या पथकांचा प्रयत्न आहे. कनिकाच्या घराच्या आसपास राहणारे लोक, तसेच तिला घरी भेटायला आलेल्या सर्व लोकांचा शोध ही पथके घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांनुसार आम्ही सतत काम करत आहोत. जो स्कॅनिंगच्या कामात बाधा आणेल किंवा पथकांना सहकार्य करणार नाही अशांच्या विरोधात पोलिस कारवाई करण्यात येईल असे अतिरिक्त जिल्हा न्यायदंडाधिकारी अमरसिंह पाल यांनी सांगितले.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply