Breaking News

भाजपचा शिवसेनेला दे धक्का

माजी आमदार बाळासाहेब सानप यांचा पक्षप्रवेश

मुंबई ः प्रतिनिधी
शिवसेनेचे माजी आमदार बाळासाहेब सानप भाजपमध्ये परतले आहेत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सानप यांनी ‘कमळ’ हाती घेतले. महापालिका निवडणुका जवळ येत असताना माजी आमदार सानप यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश नाशिकमध्ये शिवसेनेला धक्का मानला जात आहे.
आगामी काळात अनेकांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे. भाजप सोडून कुणीही जाणार नाही. काही जण उगाचच वावड्या उठवत आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्येच अनेक आमदार नाराज आहेत. त्यामुळे त्यांना दिलासा मिळावा म्हणून असे बोलले जात असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी सत्ताधार्‍यांवर निशाणा साधला.
महाविकास आघाडीने एकत्र निवडणूक लढवावी -फडणवीस
या वेळी उपस्थितांशी संवाद साधताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडातील तिन्ही पक्ष आगामी निवडणुका एकत्रपणे लढवतील, असे सांगितले जात आहे. मी म्हणेन त्यांनी नक्कीच एकत्र निवडणूक लढवली पाहिजे. माझी तर इच्छाच आहे. कारण एकत्र लढल्याने एखादा तत्कालीक फायदा त्यांना होईल, पण तीन पक्ष एकत्र आल्यामुळे जी राजकीय जागा असते त्या जागेत किती लोकं मावतील हेदेखील महत्त्वाचे असते. दोनच पक्ष एकत्रितपणे त्या राजकीय जागेत मावणे कठीण जाते, हे तीन पक्ष एकत्र येतो म्हणतात. याचा अर्थ असा आहे त्यातली सर्वांत मोठी जागा जी आहे ती भाजपसाठी ते मोकळी सोडणार आहेत आणि भाजप ती जागा व्यापल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एखाद्या-दुसर्‍या निवडणुकीत इकडे-तिकडे झाले तरी चिंता करण्याची गरज नाही.

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply