Breaking News

महाराष्ट्रात आजपासून रात्रीची संचारबंदी

मुंबई : ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील महानगरपालिका क्षेत्रात मंगळवार (दि. 22)पासून रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. 22 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालवाधीत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी (दि. 21) एक बैठक घेतली. या बैठकीत संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणार्‍या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून 14 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणार्‍या प्रवाशांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

नमो चषक महोत्सवाचा शनिवारी पारितोषिक वितरण सोहळा

माजी क्रिकेटपटू तथा प्रशिक्षक दिलीप वेंगसरकर यांची प्रमुख उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त लोकप्रिय पंतप्रधान …

Leave a Reply