मुंबई : अयोध्येतील भव्य राम मंदिर उभारणीत सर्वांचा हातभार लागावा यासाठी वर्गणी जमा केली जाणार आहे. विश्व हिंदू परिषद याकरिता एक मोहीम राबविणार आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. त्याला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. अगोदर म्हणायचे पहिले मंदिर नंतर सरकार, मग सरकार आल्यावर मंदिर निर्मितीत अडथळा आणायचा. या पद्धतीची रामविरोधी भूमिका शिवसेना घेत आहे, असे शेलार यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले.
शेलार यांनी ट्विटद्वारे शिवसेना व संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राम जन्मभूमी आंदोलन म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, वंदनीय अशोक सिंघल, मोरोपंत पिंगळे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, महंत रामचंद्र परमहंस यांच्यासह कोठारी बंधू ते कारसेवक किती नावे संघर्षाची, त्यागाची, समर्पित आयुष्याची घ्यावीत तसेच ‘या आंदोलनात ज्यांची केवळ होती राजकीय घुसखोरी त्यांनाच झाली होती राम मंदिराच्या भूमिपूजनाची पोटदुखी आणि त्यांनाच आता डोळ्यात खूपतेय रामवर्गणी. रामभक्तहो, मुंबई पालिका कंत्राटदारांच्या मर्जीने चालवणार्यांना स्वतःच्या खिशातून वर्गणी काढण्याची सवय कुठे आहे’, अशा शब्दांत शेलार यांनी निशाणा साधला आहे.
राम मंदिराच्या विषयात शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना अडथळे आणण्यासाठी पहिल्या दिवसापासून कोण प्रवृत्त करीत आहे, असा सवालही शेलार यांनी उपस्थित केला आहे.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …