Breaking News

लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी जेएनपीएचा पुढकार

पंतप्रधान गतिशक्ती मल्टीमोडल मेरीटाईम रिजनल समिट

उरण ः वार्ताहर

जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण (जेएनपीए) व मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांच्या संयुक्त विद्यमाने पंतप्रधान गति शक्ती मल्टीमोडल मेरीटाईम रिजनल समिट 2022 आयोजित करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन रविवारी (दि. 17) बंदरे आणि खाणविकास मंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते झाले.

पंतप्रधानांनी ऑक्टोबर 2021मध्ये सुरू केलेल्या मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटीसाठी गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन या संकल्पनेबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या वेळी आयएएस जेएनपीए अध्यक्ष संजय सेठी, उपाध्यक्ष उन्मेष शरद वाघ, आयएएस एमबीपीए अध्यक्ष राजीव जलोटा, उपाध्यक्ष आदेश तितरमारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

दादाजी भुसे यांनी आपल्या भाषणात, पंतप्रधान गती शक्ती योजना, एक पायाभूत सुविधा बदलणारी योजना, भारताला 2040 पर्यंत 20 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे स्वप्न पूर्ण साकारण्यास मदत करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. सर्व संबंधित केंद्रीय मंत्रालये, विभाग आणि राज्य सरकारांमध्ये एकात्मिक पायाभूत सुविधा नियोजन आणि समक्रमित प्रकल्प अंमलबजावणीसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. पंतप्रधान गति शक्ती योजनेमुळे राज्य रस्ते, बंदर आणि विमानतळ कनेक्टिव्हिटीचे केंद्र म्हणून उदयास येऊ शकतील आणि राज्यातील व्यापार आणि आर्थिक समृद्धी वाढेल, असा विश्वास व्यक्त केला.

संजय सेठी यांनी, गती शक्ती संसाधनांची देवाणघेवाण करून आणि अधिक सामंजस्यपूर्ण इकोसिस्टम तयार करण्याच्या दिशेने समन्वय विकसित करून पायाभूत सुविधांच्या पाइपलाइनला अधिक शक्ती आणि गती देईल असे सांगून जेएनपीएची मल्टी-मॉडल कनेक्टिव्हिटी पीएम गति शक्तीच्या धर्तीवर खूप मोठे योगदान देते असे नमूद केले. राजीव जलोटा म्हणाले, पंतप्रधान गति शक्ती सहा स्तंभांवर आधारित आहे. सर्वसमावेशकता, प्राधान्यक्रम, ऑप्टिमायझेशन, सिंक्रोनायझेशन, विश्लेषणात्मक आणि गतिमान. गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन पायाभूत सुविधा आणि आर्थिक मंत्रालयांसाठी एक वास्तविक वेळ निर्णय घेण्याचे साधन बनेल.

या समिटमध्ये विभागांमध्ये समन्वय निर्माण करणे, ब्रेकिंग द सायलोस, ऑप्टिमायझेशनसाठी तंत्रज्ञानाचा वापर, वेळ आणि खर्च कमी करणे, डेटा मॅनेजमेंट एनालिटिक्स अँड युटिलायझेशन, गतीशक्तीचे कन्व्हर्जिंग अमृत काल व्हिजन 2047 आणि गतीशक्ती उपक्रमांचे परिणाम व आउटपुट यासारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply