न्यूजर्सी : वृत्तसंस्था
रेसलमेनिया ही डब्लूडब्लूईची वर्षातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. त्यामुळे डब्लूडब्लूईचे चाहते या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहात असतात. जगभरात आंतराष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणार्या जवळपास सर्वच स्पर्धांमध्ये प्रतिस्पर्ध्यांची यादी किमान 15 दिवस आधी जाहीर केली जाते. परंतु थथए थीशीींश्रशचरपळर या अघोषित नियमाला अपवाद आहे. चाहत्यांना आश्चर्यचकित करून या स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी अनेक मोठे सामने गुलदस्त्यात ठेवले जातात. या प्रथेमुळे मोक्याच्या क्षणी अनेक गमतीदार प्रसंग घडतात आणि असाच एक प्रसंग थथए थीशीींश्रशचरपळर 34 मध्ये घडला. या स्पर्धेत चक्क एका 10 वर्षांच्या मुलाने डब्लूडब्लूई टॅग टिम टायटलवर स्वतःचे नाव कोरले होते.
डब्लूडब्लूईमध्ये ढरस ढशरा उहराळिेप नावाचे एक टायटल आहे. डब्लूडब्लूईमधील हे अत्यंत मानाचे टायटल म्हणून ओळखले जाते. हे टायटल मिळवण्यासाठी दोन खेळाडू मिळून आपली एक टीम तयार करतात. ही टीम त्यांच्यासारख्याच दुसर्या एका टीमला आव्हान देते. ही स्पर्धा जिंकणार्यांना ढरस ढशरा उहराळिेप असे घोषित केले जाते. नेहमीप्रमाणे अशीच एक स्पर्धा आयोजित केली गेली होती. हा सामना सेसॅरो व शेमस विरुद्ध ब्रॉन स्ट्रोमन असा होता. डब्लूडब्लूई नियमाप्रमाणे टॅग टिम मॅचमध्ये दोन खेळाडू विरुद्ध दोन खेळाडू खेळणे अनिवार्य आहे, परंतु ब्रॉन स्ट्रोमनने डब्लूडब्लूईच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडून विशेष संमती मिळवून टॅग टिम मॅच एकट्यानेच खेळण्याचा निर्णय घेतला. डब्लूडब्लूईमध्ये या प्रकाराला हँडिकॅप मॅच असे म्हटले जाते, परंतु अंतिम सामन्यात सेसॅरो व शेमस या जोडीने ब्रॉन स्ट्रोमन एकटा असल्यामुळे त्याच्या विरोधात खेळण्यास नकार दिला. हा अंतिम सामना नियमाला धरून नसल्यामुळे पंचानीही ब्रॉन स्ट्रोमन विरोधात आपला आक्षेप दर्शवला. दरम्यान, त्याला आपला सहकारी निवडण्यासाठी पाच मिनिटांचा वेळ देण्यात आला.
या अनपेक्षित प्रसंगाने चक्रावलेल्या ब्रॉन स्ट्रोमनने प्रेक्षकांत बसलेल्या निकोलस या 10 वर्षांच्या मुलाला फाईट रिंगमध्ये बोलावले. त्याला त्याने आपला फाईट पार्टनर म्हणून घोषित केले आणि त्यानंतर डब्लूडब्लूईमध्ये एक नवीन इतिहास रचला गेला.