खोपोली : प्रतिनिधी
स्काऊट गाईडच्या राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या खोपोली येथील शिशु मंदिर शाळेतील सृष्टी दिलीप म्हसे व चिन्मय मनोज हातणकर यांना राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते स्काऊट्स आणि गाईड्स अंतर्गत राज्य पुरस्कार प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स आणि गाईड्स अंतर्गत राज्य पुरस्कार प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम रविवारी (दि. 8) मुंबईतील शिवाजी पार्क येथील स्काऊट गाईड पॅव्हेलियन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला स्काऊट गाईडचे मुंबई अध्यक्ष ज्ञानोबा मुंडे, मुख्य प्रशासक शरद उघडे, प्रशासक संतोष मानूरकर, कार्तिक मुंडे उपस्थित होते. भोर (जि. पुणे) येथे सन 2016-17मध्ये घेण्यात आलेल्या स्काऊटच्या राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये खोपोलीतील आयुष जैन, यश सिंग, शुभम मालुसरे, आरिष मोमीन, अरिंदम डोंगरे, गौरव दास, गणेश हेगडे, प्रणव बेंद्रे, चिन्मय हातणकर, शाहीद लोगडे, साहिल पाटील, सोहम भातखंडे, अक्षय जानकर, श्रीयश खेंगरे, आदित्य फराटे, निहार रसाळ, केतन पाटील, मदन कनोजिया हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते, तसेच गाईडमध्ये सृष्टी म्हसे, बन्सी ठक्कर, मनीषा गेहलोत, अपूर्वा गोरड, स्वराली महावरकर, रिया सोनार, अल्फिया खान, प्रियंका शर्मा, आदिती संजय आतर्डे, रिद्धी राजेश देशमुख, भाविका संजू साबळे, ध्वनी धर्मेंद्र पटेल, ईशा पंडित, लक्ष्मी दुबे, आर्ची जैन, श्रुती पाटील, संजना परब या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या होत्या. शिशुमंदिर अध्यक्ष विजय चुरी, मुख्याध्यापिका जान्सी ऑगस्टीन, वरिष्ठ शिक्षिका सुनीता चव्हाण व सर्व शिक्षकांनी राज्य पुरस्कारप्राप्त विद्यार्थी व शिक्षक आशा देशमुख व योगेश भोसले यांचे अभिनंदन केले.