पनवेल : वार्ताहर
करंजाडे येथील नवीन बांधण्यात आलेल्या शिवसाहीज मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचा लोकार्पण सोहळा भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. बाळासाहेब पाटील म्हणाले की, करंजाडेमधील नागरिकांना शिवसाहीज मल्टीस्पेशालिटीच्या मार्फत चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होणार आहेत. तसेच डॉ. वेलहारे यांनी लहान वयात त्यांनी खूप प्रगती केली असल्याचे सांगून त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या वेळी परिसरातील नागरिक उपस्थित होते.