Breaking News

पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद

नवी मुंबई : विमाका

दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त  नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने बुधवारी (दि. 6) पत्रकारदिनी  परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर-16 ए, छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी, नवी मुंबई येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून माहिती व जनसंपर्क विभागावे महासंचालक तथा सचिव डॉ. दिलीप पांढरपट्टे,  दैनिक लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, सामाजिक कार्यकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी आदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास विद्यार्थी, पत्रकार आणि नागरीकांनी जास्तीत जास्त संख्येने  उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक  कोकण विभागातील विभागीय माहिती कार्यालयाचे उपसंचालक डॉ. गणेश मुळे, नवी मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज जालनावाला, नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्सचे अध्यक्ष मच्छिंद्र पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे. 

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply