Breaking News

एक कदम आत्मनिर्भरता की ओर प्रशिक्षण शिबिरास खारघरमध्ये प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्त

भाजप उत्तर रायगड महिला मोर्चा, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि खादी ग्रामोद्योग कमिशन यांच्या माध्यमातून ‘एक कदम आत्मनिर्भता की ओर’ अंतर्गत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन सोमवारी (दि. 11) करण्यात आले होते. हे शिबिर खारघर येथील रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये आयोजित करण्यात आले असून, या शिबिराचे उद्घाटन खादी ग्रामोद्योगाच्या डायरेक्टर किरण उके यांच्या हस्ते झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आत्मनिर्भर भारत’ हा उपक्रम देशभरात राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये विविध क्षेत्रात आत्मनिर्भर बनून उद्योग कशाप्रकारे सुरू करण्यात येतील, त्याचे मार्केटिंग कसे करावे, शहरी भागात आपण कशाप्रकारे व्यवसाय करू शकतो, तसेच कर्ज कसे उपलब्ध होऊ शकते या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी भाजप जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, पनवेल मनपाच्या माजी उपमहापौर तथा जिल्हा चिटणीस चारुशीला घरत, सरचिटणीस मृणाल खेडकर, पनवेल मनपाच्या प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, नगरसेविका रामजी बेरा, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, खारघर शहर अध्यक्षा वनिता पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, खादी ग्रामोद्योगचे उपनिर्देशक किरण उळई, उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष मंदार मेहेंदळे, संध्या शारबिंद्रे, सरचिटणीस दिपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, महिला मोर्चाच्या गीता चौधरी, मोना आडवाणी, बीना गोगरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

रामबागचा वर्धापन दिन उत्साहात साजरा; मान्यवरांची उपस्थिती

पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणार्‍या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या पनवेल तालुक्यातील …

Leave a Reply