Breaking News

महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हाध्यक्षपदी हभप पुंडलिक महाराज फडके

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यातील मोहो गावातील हभप पुंडलिक महाराज फडके यांची महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळांतर्गत रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे. ही निवड महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष हभप प्रकाशजी महाराज जवंजाळ, आळंदी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती पंढरपूर विश्वस्त व महामंडळाचे सचिव हभप नरहरी महाराज चौधरी यांच्या हस्ते झाली. तसेच त्यांना पदग्रहण प्रमाणपत्रही देण्यात आले. हा पदग्रहण सोहळा बांठिया हायस्कूल पटांगणातील अखंड हरिनाम सप्ताहात करण्यात आला. या वेळी पुंडलिक महाराज फडके यांना वारकरी संप्रदायाची सेवा अखंड व निष्ठापूर्वक घडो अशा शुभेच्छा देण्यात आल्या.या सोहळ्यालोी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे सदस्य हभप धनाजी महाराज पाटील, पुणे जिल्हाध्यक्ष हभप विलासजी बालवडकर, ठाणे जिल्हाध्यक्ष हभप जयरामजी महाराज डायरे, ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख हभप अजय पाटील, हभप रामदास बाबा तलोजे, हभप गोविंद महाराज घरत, कोकण दिंडीचे अध्यक्ष हभप पद्माकर महाराज पाटील, सुकापूर येथील हभप चाहूशेठ पोपेटा, हभप धाऊशेठ पाटील आदी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Check Also

खोपोलीत 106 कोटींचे ड्रग्ज जप्त

पोलिसांची कंपनीत कारवाई, त्रिकूट ताब्यात खोपोली, खालापूर : प्रतिनिधी खोपोली पोलिसांनी ढेकू गावच्या हद्दीतील एका …

Leave a Reply