Breaking News

पंचशीलनगर सामाजिक संस्थेतर्फे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी

पनवेल ः वार्ताहर

पंचशीलनगर सामाजिक संस्था नवीन पनवेल यांच्याकडून माता रमाई जयंती दिनी राष्ट्रमाता जिजाऊ, माता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.

पंचशीलनगर बुद्ध विहारात पंचशीलनगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे व खजिनदार भानुदास वाघमारे यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. संस्थेच्या सहसचिवांनी माता रमाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी, माता सावित्री, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्या प्रतिमेला सुरेखा वायदंडे, पल्लवी आखाडे, रूपाली खंडागळे, अक्षदा जाधव आदींनी पुष्पहार अर्पण केले. यानंतर लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संस्थेचे सचिव राहुल पोपलवार यांनी संस्था पंचशीलनगरच्या विकासासाठी पाठपुरावा करून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवणार असल्याचे सांगत सर्व झोपडीधरकांनी संस्थेचे सभासद व्हावे, जेणेकरून आमच्याकडे सर्व माहिती असल्यास शासकीय, निमशासकीय विविध योजना आपल्यापर्यंत पोहचवता येतील. त्यामुळे पंचशीलनगरच्या राहिवाशांनी सभासद म्हणून नावे नोंदवावीत, असे आवाहन केले.

कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, खजिनदार भानुदास वाघमारे, सहखजिनदार कांताबाई वानखेडे, संघटक कैलास नेमाडे, सहसंघटक सुरेखा वायदंडे, सदस्य सुरेश पराड, रामदास खरात, संतोष जाधव, संजय धोत्रे, संतोष ढोबळे, अमेय इंगोले, हेमा रोड्रिंक्स, शोभा गवई, वल्ली महमद शेख, अजय दुबे आदींसह अनेक नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोपाळ उबाळे, अनिल वानखेडे, अमन तायडे, अविनाश पराड, धीरज नाईक, करण बोरूडे, शुभम वानखडे आदींनी मेहनत घेतली.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply