Breaking News

धनंजय मुंडेंनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे : प्रतिनिधी

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यावा, तसेच रेणू शर्मा यांच्यावर अनेकांनी आरोप केलेत, त्या प्रकरणीही कोणत्याही चौकशी यंत्रणेकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांच्याबाबत शरद पवार यांनी अगोदर एक विधान केले. त्यानंतर घूमजावही केले, मात्र राज्यातील साडेअकरा कोटी जनता हे सहन करणार नाही. रेणू शर्मांची चौकशी जरूर करा, पण करुणाचे काय? ती माहिती इतके दिवस का लपवली? या नैतिकतेच्या मुद्द्यावर तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला. सध्या राजकीय क्षेत्रात तीळगूळ देणे सुरू झाले आहे. यावर भाष्य करताना पाटील म्हणाले, तीळगूळ देण्याची आपली संस्कृती आहे. त्यामुळे मी पवारसाहेब, उद्धवजी यांना भेटल्यावर निश्चित तीळगूळ देईन, तसेच मेधा कुलकर्णी आणि माझे राजकीय गुरू गिरीश बापट यांनाही देईन.

उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन

धनंजय मुंडे यांनी लैंगिक अत्याचारप्रकरणी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी आम्ही करीत आहोत, मात्र अद्यापही ते राजीनामा देत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजप महिला मोर्चाच्या माध्यमातून सोमवार (दि. 18)पासून राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांसमोर आंदोलन करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply