पनवेल : रामप्रहर वृत्त
कच्छ युवक संघ, पनवेल व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल आणि जायंट्स गु्रप ऑफ पनवेल यांच्या वतीने एंकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
हे शिबिर पनवेल येथील हुतात्मा स्मारक उद्यान येथे रविवारी संपन्न झाले. या रक्तदान शिबिरास नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती होती.
पनवेलमध्ये गेली 11 वर्षे युवक संघाकडून सातत्याने वर्षातून तीन वेळा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या अनुषंगाने पनवेलमधील हुतात्मा स्मारक उद्यान येथे कच्छ युवक संघ, पनवेल व प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय पनवेल आणि जायंट्स गु्रप ऑफ पनवेल यांच्या वतीने एंकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये असंख्य नागरिकांनी रक्तदान केले. हे शिबिर मुग्धा लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.