Breaking News

नेरळमध्ये पर्यावरणपूरक आकाशकंदिल

दिवाळीनिमित्त महिला बचत गटांचे विविध उपक्रम

कर्जत : बातमीदार

नेरळ येथील यशवंती महिला बचत गटाच्या सदस्यांनी   दिवाळी सणासाठी आकाशकंदिल बनविण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. रोजगार निर्मिती म्हणून बनवलेले हे पर्यावरणपूरक कंदिल उल्हासनगर आणि कल्याण येथील बाजारात ग्राहकांच्या पसंतीला उतरत आहेत.

नेरळ येथील रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष वर्षा बोराडे यांनी आपल्या विभागातील गरीब महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी विविध प्रकारचे कंदिल बनविण्याचे काम करतात.

या महिला नवरात्रीपासून पर्यवरणपूरक आणि कधीही धुऊन घेता येतील असे कंदिल बनवत आहेत. मायक्रॉनपासून बनवलेले हे कंदिल आकर्षक असून, प्लास्टिक बॉल, मणी यांचा वापर केला जात असल्याने हे कंदिल लवकर खराब होत नाहीत. म्हणूनच या कंदिलांची तत्काळ विक्री होते, अशी माहिती वर्षा बोराडे दिली.

नेरळ परिसरातील मोहाचीवाडीमधील अन्य बचत गटाच्या महिला दिवाळीमध्ये फराळ बनविणे, मातीच्या पणत्या आणि दिवे या वस्तू बनविण्याचे काम करतात.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply