पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर येथे युथ क्लबच्या वतीने व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सिडको अध्यक्ष तथा भाजप रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या टुर्नामेंटला भेट दिली. या वेळी तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत उपस्थित होते.
खारघर सेक्टर 16, 17 येथे युथ क्लबच्या वतीने आयोजित व्हॉलीबॉल टुर्नामेंटच्या उद्घाटन सोहळ्यात अनेकांनी सहभाग घेतला. या वेळी प्रभाग समिती ‘अ’ सभापती अभिमन्यू पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, समीर कदम, दीपक शिंदे, अजय माळी, अमर उपाध्याय, आयोजक संदीप गोरे, अशोक गोळे, हेमंत रासकर, म्हस्के, सिंग, भट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.