Breaking News

जात प्रमाणपत्र पडताळणी मार्गदर्शन कार्यशाळा

नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांमार्फत 6 ते 14 एप्रिल या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्याअंतर्गत मंगळवारी (दि. 12) सकाळी 10 वा. ठाणे जिल्ह्यातील 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील महाविद्यालयाच्या प्राचार्य व इतर कर्मचार्‍यांकरीता जात पडताळणीची कार्यपद्धती याबाबत मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. द पिपल्स एज्युकेशन सोसायटी हायस्कूल आणि ज्यूनिअर कॉलेज, सेक्टर-1 सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई या ठिकाणी मार्गदर्शन कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेस ठाणे जिल्ह्यातील 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गातील विद्यार्थ्यांनी तसेच ठाणे जिल्हा परिसरातील महाविद्यालयातील प्राचार्य, संबंधित कर्मचार्‍यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ठाणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य वासुदेव पाटील यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply