खारघर येथे रस्ते वाहतूक अभियान उत्साहात; मान्यवरांची उपस्थिती
खारघर : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता युवा मोर्चा खारघर-तळोजा मंडल व खारघर वाहतूक विभाग यांच्या वतीने शनिवारी (दि. 13) रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात आले. त्या अंतर्गत वाहनचालकांसाठी सुरक्षेचे महत्त्व, तसेच मद्यपानामुळे होणारे अपघात या संदर्भात जनजागृती करण्यात आली. या वेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते.
खारघरमधील हिरानंदानी सिग्नलजवळ राबविण्यात आलेल्या अभियानात आमदार प्रशांत ठाकूर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद चव्हाण, व युवा मोर्चाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी तसेच गिरीजघर अनाथालयामधील मुलांनी प्रबोधन केले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा अध्यक्ष विनोद घरत, सरचिटणीस दीपक शिंदे, कीर्ती नवघरे, अल्पसंख्याक सेलचे मन्सूर पटेल, अमर उपाध्याय, शुभ पाटील, युवा उपाध्यक्ष अक्षय पाटील, चिटणीस पप्पू खामकर, फुलाजी ठाकूर, प्रमोद पाटील,
सुशांत पाटोळे, निखिल जाधव, सुजित पांडे, नाईम शेख, सचिन चिखलकर यांच्यासह गिरीजघर अनाथालयातील मुले उपस्थित होती.