Breaking News

आमदार महेश बालदी यांच्याकडून पागोट्यातील भाजपच्या शिलेदारांचे अभिनंदन

उरण ः वार्ताहर
थेट सरपंच म्हणून निवडून आलेले पागोटे सरपंच अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्यावरील अविश्वास ठरावाला ग्रामसभेत मंजुरी देण्यात आली. अविश्वास ठरावाच्या बाजूने 493 ग्रामस्थांनी, तर अ‍ॅड. भार्गव पाटील यांच्या बाजूने 376 लोकांनी मतदान केले. त्यामुळे सध्या बहुमताने अविश्वासाचा ठराव मंजूर होऊन पागोटे ग्रामपंचायतीवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकला आहे. त्याबद्दल सदस्य व कार्यकर्त्यांनी आमदार महेश बालदी यांची सदिच्छा भेट घेतली.  या वेळी आमदार बालदी यांनी त्यांचे अभिनंदन केले.
या वेळी जिल्हा उपाध्यक्ष जितेंद्र पाटील, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, उरण शहर अध्यक्ष कौशिक शाह, उपसरपंच सुमित पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रदीप पाटील, मिलिंद तांडेल, महालण महिला विभाग अध्यक्ष वैजंती पाटील, गाव अध्यक्ष विजय पाटील, गाव अध्यक्ष भाजप महिला नंदिनी ठाकूर, युवा मोर्चा सरचिटणीस मनीष पाटील, भाजप नेते आशिष तांडेल, मनीष तांडेल, किरण तांडेल, किरण पंडित, राकेश म्हात्रे, निलेश पाटील, सोनू तांडेल, निशांत पाटील, विश्वजित ठाकूर आदी भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply