‘रवी डायवेअर’मध्ये जय भारतीय जनरल कामगार संघटनेचा झेंडा; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते युनिटच्या नामफलकाचे अनावरण

पनवेल ः प्रतिनिधी

तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रवी डायवेअर प्रायव्हेट लिमिटेड(युनिट 2) कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 13) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते येथील युनिटच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले.

या वेळी भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, नगरसेवक प्रवीण पाटील, जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, रवींद्र नाईक, सरचिटणीस मोतीलाल कोळी, संघटक रवींद्र कोरडे, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण, सचिव विनायक मुंबईकर, माजी सरपंच कृष्णा पाटील, राम पाटील, गजानन पाटील, सावळे ग्रामपंचायतीचे सरपंच प्रशांत माळी, कामगार प्रतिनिधी अरुण नरवाडे, विजय कुरुंगळे, संतोष घरत, अंकुश भोईर, दीपक पाटील, राजेश साळवी, नारायण पाटील, सचिन पाटील, राजेंद्र तारेकर, रामदास गोंधळी, अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.

जय भारतीय जनरल कामगार संघटना कामगार आणि कारखान्यांच्या उन्नतीसाठी काम करीत आहे. कामगार जगला तरच कंपनी जगेल आणि कंपनी प्रगती करेल, तरच कामगारांचीही प्रगती होणार आहे. त्या अनुषंगाने कामगार आणि कंपनी या दोघांच्या प्रगतीसाठी संघटना काम करीत आहे.

-प्रशांत ठाकूर, आमदार

Check Also

Zimpler Casinos fifty+ Finest Casinos double tigers slot on the internet Taking Zimpler

Articles Double tigers slot: Could there be one support service to contact?: Guide away from …

Leave a Reply