Breaking News

पनवेल, उरणमध्ये विकासाचा झंझावात; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पाणपोई, हायमास्टचे लोकार्पण

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेतील भाजपच्या नगरसेविका अ‍ॅड. वृषाली वाघमारे यांच्या नगरसेवक निधीतून नवीन पनवेल सेक्टर 13मध्ये उभारण्यात आलेल्या पाणपोईचे, तसेच सेक्टर 13 व 18 येथील विविध ठिकाणच्या हायमास्टचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे या वेळी मान्यवरांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमांना सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, प्रभाग समिती ’ड’ सभापती सुशिला घरत, नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, ज्येष्ठ नेते सी. सी. भगत, युवा नेते रवींद्र नाईक, वॉर्ड अध्यक्ष विजय म्हात्रे, प्रशांत फुलपगार, शिव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष भरत पाटील, सचिव हरिश्चंद्र गायकवाड, जनार्दन पाटील, विचुंबेचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर, किशोर सुरते, अ‍ॅड. जितेंद्र वाघमारे, अशोक अंबेकर, पप्पू साळवी, नंदा टापरे, वारकरी सांप्रदाय मंडळ नवीन पनवेलचे अध्यक्ष धावूशेठ पाटील, जय बजरंग मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद वाघमारे, योगेश हांडगे, इंद्रजित कानू, तेजस म्हात्रे, राजेंद्र घरत, हेमंत पिसाळ, भालचंद्र वाघमारे, वीरेंद्र चोरघे, राजू ठोकळ, प्रेम डुकरे आदी उपस्थित होते.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply