Breaking News

सराईत चोरटे गजाआड; घरफोडीतील ऐवज हस्तगत

पनवेल ः वार्ताहर

पनवेल शहरात घरफोडीसह एका टेम्पोच्या बॅटरीसह टायर चोरणार्‍या दुकलीस पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोरट्यांना गजाआड केले असून, त्यांच्याकडून घरफोडीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

सुरेखा भेंडे (रा. लाइन आळी, पनवेल) यांच्या राहत्या घराचा कडीकोयंडा उचकटून आरोपी रिक्षाचालक रवी आरकेरी (25) व त्याचा सहकारी अर्जुन गायकवाड (58, रा. अंबरनाथ) यांनी सोन्या-चांदीच्या वस्तूंसह 15,500 रुपयांचा ऐवज चोरला होता. त्याचप्रमाणे डेरवली येथील देवराम ढोंबरे यांच्या टेम्पोतील बॅटर्‍या व टायर असा मिळून जवळपास 10 हजारांचा माल तसेच सुभाष शिंदे यांच्या जयश्री महालक्ष्मी कॉस्मेटिक दुकानातील टॉवेल, पँटीज व इतर साहित्य असा मिळून जवळपास 20,425 रुपयांचा ऐवज चोरला होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस पथकाने सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय बातमीदार व तांत्रिक तपासाच्या आधारे यातील दोन सराईत गुन्हेगारांना रिक्षा व गुन्ह्यात वापरलेल्या हत्यारांसह एक लाख 81 हजार 500 रुपयांच्या मुद्देमालासह अटक केली. याबाबतचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुनील तारमळे करीत आहेत.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply