Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त गायन स्पर्धा

खारघर ः रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे कॅपेला-संगीत साधनांव्यतिरिक्त या गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा ऑनलाइन असून, 3 एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे.
स्पर्धा पनवेल तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेसाठी आतापर्यंत 40 कनिष्ठ महाविद्यालयांनी संपर्क साधला आहे. पनवेल तालुक्यातील जास्तीत जास्त कनिष्ठ महाविद्यालयांनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा. नाव नोंदणी करण्याची अंतिम तारीख 31 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आहे. त्यासाठी शारदा पगारे (9561141709) किंवा विकास गाढवे (9326477475) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विद्यालयाच्या प्राचार्य दुर्गादेवी मोर्या आणि शिक्षकवृंदाने केले आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply