Breaking News

‘त्या’ विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनामुळे दहावी आणि बारावीचे जे विद्यार्थी आता परीक्षा देऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
विद्यार्थी कोरोनाबाधित असेल किंवा विद्यार्थ्यांच्या घरात, परिसरात कोरोना रुग्ण असतील आणि तो राहत असलेला विभाग सील केला असेल तर अशा विद्यार्थ्यांना सध्या घोषित केलेल्या तारखेला दहावी, बारावीची परीक्षा देता येणार नाही. या विद्यार्थ्यांसाठी जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार आहे. याकरिता संबंधित शाळांनी त्या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.
दरम्यान, इयत्ता दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 21 मेदरम्यान आणि इयत्ता बारावीची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे या नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षेबाबत काही महत्त्वाचे निर्णय बोर्डाने आधीच घेतले आहेत.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply