पनवेल ः रामप्रहर वृत्त
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन, रोटरी क्लब ऑफ पनवेल मिडटाऊन आणि रोटरी रायगड वॉरियर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रा. लि. (टीआयपीएल) रोटरी प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धा रोटरी प्रांत 3131मधील क्रिकेटप्रेमी सदस्यांसाठी 22 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत मोहोपाडा येथील सेबी मैदानावर खेळविण्यात आली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. 31) करण्यात आले.
सहा दिवस सहा संघांमध्ये अटीतटीच्या लढती होऊन 31 ऑक्टोबरला अंतिम फेरीचे सामने रंगले. यामध्ये बाश्री संघाने बीकेसी संघावर मात करून टीआयपीएल प्लॅटिनम करंडक जिंकला. अल्टीमेट संघाने सुखम संघाला पराभूत करून टीआयपीएल सुवर्ण करंडक पटकाविला, तर टीआयपीएल रौप्य करंडक आदित्य संघाने क्युबिल्ट संघाला हरवून मिळविला.
स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून अल्टीमेट संघातील फैय्याज लांडगे, उत्कृष्ट फलंदाज अभिषेक मोहिते (बीकेसी संघ), उत्कृष्ट गोलंदाज विजय नवले (बीकेसी संघ) आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सिकंदर पाटील, उत्कृष्ट यष्टीरक्षक डॉ. आमोद दिवेकर, गेम चेंजर निलेश ठाकूर, ज्येष्ठ अष्टपैलू खेळाडू सुनील रोहिला यांची निवड करण्यात आली.
बक्षीस समारंभ रोटरीचे माजी प्रांतपाल डॉ. गिरीश गुणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, रोटरी क्लब पनवेल सेंट्रलचे माजी अध्यक्ष शिरीष वारंगे, भावी अध्यक्ष लक्ष्मण पाटील, रोटरी क्लब पनवेल इंडस्ट्रियल टाऊनचे माजी अध्यक्ष अरविंद सावळेकर, माजी सेक्रेटरी चारुदत्त भगत, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष विजय निगडे, रोटरी प्रांत पदाधिकारी अविनाश कोळी, अलका कोळी, हरमेश तन्ना, कल्पेश परमार, प्रशांत माने यांच्या उपस्थितीत झाला.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोटरी रायगड वॉरियरचे देवेंद्र चौधरी, अतुल भगत, गणेश कडू, सतीश देवकर, डॉ. संतोष जाधव, डॉ. आमोद दिवेकर, प्रीतम कैया, विक्रम कैया, आनंद माळी, ऋषी बुवा, संतोष घोडींदे, पंकज पाटील, रतन खरोल, अनिल खांडेकर, अतुल मढवी, योगेश वाघ, सुदीप गायकवाड, जयंत म्हात्रे आदींनी परिश्रम घेतले.
Check Also
पनवेल रेल्वेस्थानकात आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल रेल्वेस्थानक परिसरात सध्या नवीन रेल्वे ट्रॅक, पार्किंग आणि प्लॅटफॉर्मवरील विविध कामे …