Breaking News

महिलांची आगोटची कामे सुरू

पापड, कुरडया, खारोड्या करण्याची लगबग

कर्जत : प्रतिनिधी

होलोकोत्सव झाला की ग्रामीण भागातील महिलांची आगोटीची कामे करण्याची लगबग सुरू होते. या दिवसांत वर्षभर पुरतील एव्हढे पापड, कुरडया, खारोड्या, पापड्या बनविण्याकडे महिलांचा कल असतो.

ग्रामीण भागातील महिला होळीच्या पूर्वी वर्षभर पुरेल असा मसाला, हळद, धणे करून घेण्यात मग्न असतात. तर मार्गशीर्ष महिन्यात पापड करण्याचा मुहूर्त करतात. होलिकोत्सव संपला की कडक उन्हाळा सुरू होतो. त्यामुळे आगोटीची म्हणजे पावसाळ्यापूर्वीची कामे करण्याची सुरुवात करतात. वर्षभर पुरेल इतके पापड, कुरडया, खारोड्या, साबुदाण्याच्या चिकोड्या, पापड्या करण्याची लगबग सुरू होते. त्यासाठी महिला एकमेकीला मदत करतात. ग्रामीण भागात घरांपुढे अंगण असल्याने हे सारे करण्याचे सोईचे असते.

Check Also

उलवे पोलीस ठाण्याचे शानदार उद्घाटन

परिसरातील नागरिकांना न्याय मिळेल -आमदार महेश बालदी उलवे नोड ः रामप्रहर वृत्त आमदार महेश बालदी …

Leave a Reply