पाली : प्रतिनिधी
अलिबाग येथील नेहरू युवा केंद्रातर्फे सुधागड तालुक्यातील शिळोशी येथील जय हनुमान आखाड्याला नुकतीच क्रीडा साहित्याची भेट देण्यात आली. जय हनुमान आखाड्यात शिवकालीन शस्त्रास्त्र चालविणे, लाठी- काठी व मल्लखांब आदी मर्दानी खेळ शिकविले जातात. नेहरू युवा केंद्राचे ऋषी झा यांनी पाली येथील क्रीडा संकुलात हे खेळाचे साहित्य आखाड्याचे अध्यक्ष शरद गोळे, प्रशिक्षक श्रीधर गोळे व प्रसाद गोळे यांच्याकडे सुपूर्द केले. युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी रौतेला सर, प्रोग्राम ऑफिसर सिंह सिर व सुशील सायकर यांच्या सौजन्याने हे क्रीडा साहित्य उपलब्ध झाले.