Breaking News

महाडमध्ये रुग्णांना स्वच्छता किटचे वाटप

महाड : प्रतिनिधी

मेमन समाज स्थापना दिवसाचे औचित्य साधून येथील मेमन जमातीकडून गुरुवारी (दि. 11) महाड ट्रामा सेंटरमधील रुग्णांना स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. महाड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला

11 एप्रिल हा मेमन समाजाचा स्थापना दिवस आहे. त्या निमित्ताने गुरुवारी येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये महाड मेमन समाजाकडून रुग्णांना फळं आणि स्वच्छता किटचे वाटप करण्यात आले. यावेळी डॉ. भास्कर जगताप यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कोकणे, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, सामाजिक कार्यकर्ते मुबिन देशमुख, महाड मेमन समाजाचे अध्यक्ष हाजी आरिफ विंधानी, सचिव मुखतार मोटलानी, फरहान फजलानी आदी उपस्थित होते. या वेळी सुमारे 40 रुग्णांना या किटचे वाटप केले. वैयक्तिक स्वच्छता विषयक साहित्य आणि कागदी पिशवीवर स्वच्छता संदेश देऊन ही जागृती करण्यात आली.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जावेद मोटलानी, फारुख विंधानी, रफिक खटानी, हनिफ लंघा, राजू बाणानी, सलमान मोटलानी, बिलाल विंधानी, बशीर विंधानी, रफिक मेमन यांनी विशेष मेहनत घेतली.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply