Breaking News

नाल्याच्या सफाईचे काम तातडीने व्हावे -सीता पाटील

खांदा कॉलनी : रामप्रहर वृत्त

नवीन पनवेलहून खांदा वसाहतीत येणार्‍या मुख्य पावसाळी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली असून, त्यात कचराही मोठ्या प्रमाणात साचलेला आहे. पावसाळा जवळ आला असून, दरवर्षीप्रमाणे यंदा या नाल्याची सफाई होताना मात्र दिसत नाहीत. त्यामुळे तातडीने या संदर्भात कार्यवाही करावी, अशी मागणी नगरसेविका सीता पाटील यांनी सिडकोकडे केली आहे.

खांदा कॉलनीतून तीन मुख्य पावसाळी नाले जातात. एक नवीन पनवेल येथून थेट कामोठा खाडीला जोडणारा नाला आहे. हा नाला नवीन पनवेलसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आसुडगाव आणि खांदा कॉलनीमधून जाणार्‍या नाल्याची

मान्सूनपूर्व साफसफाई करणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी अडथळे निर्माण होतील. त्यामुळे या परिसरातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. नवीन पनवेल परिसरातील पावसाचे पाणी याच नाल्यांमधून खाडीला जाऊन मिळते; परंतु या नाल्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत, तर काही ठिकाणी नागरी कचराही साचलेला आहे. त्यामुळे नगरसेविका सीताताई पाटील यांनी याबाबत सिडकोला पत्र देऊन या संदर्भात त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply