Breaking News

काजूगर उद्योग प्रक्रियेला रायगडात खीळ

Sorting cashew fruit

माणगाव : प्रतिनिधी

कोकणात आंब्याबरोबर काजू हे महत्वाचे फळ आहे. रायगड जिल्ह्यातही काजू मोठया प्रमाणात पिकत आहे. मात्र काजूगर प्रक्रियेसाठी लागणारे भांडवल सुशिक्षित बेरोजगार उद्योजकांकडे नसल्यामुळे रायगड जिल्ह्यातील काजूगर प्रक्रिया उद्योगाला खीळ बसली आहे. 

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, माणगाव, रोहा, सुधागड, कर्जत या तालुक्यात प्रामुख्याने काजू पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. जिल्ह्यात काजू बागाचे क्षेत्र तीन हजार एकशे पंचवीस हेक्टर आहे. या वेंगुर्ला एक, चार, सहा, सात व आठ या काजू पिकाच्या जाती असून, वेंगुर्ला चार या जातीची काजूची झाडे रायगड जिल्ह्यात मोठया प्रमाणात आहेत. या झाडाला फळे येण्यासाठी लागवडीपासून सरासरी चार ते पाच वर्षे लागतात. एक झाड सरासरी चौदा ते वीस किलो काजू बियांचे उत्पादन मिळवून देत असते.

रायगड जिल्ह्यात जिल्ह्यात काजू बागाचे क्षेत्र तीन हजार एकशे पंचवीस हेक्टर असले तरी जंगल व अन्य ठिकाणीही काजूची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. यांच्या झाडापासून बासष्ट हजार पाचशे मेट्रिक टन काजू बिया मिळू शकतात. त्यापासून पंधरा हजार सहाशे पंचवीस किलो निव्वळ काजूगर विक्रीसाठी निघू शकतो.  काजू हे पिक नाशिवंत नाही. त्यामुळे ते उशीराही बाजारात पाठविले तरी चालते. मात्र जिल्ह्यात बाजारपेठ यासाठी मोठया प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे काजूगर उद्योग प्रक्रिया अत्यल्प असल्यामुळे शेतकरी, काजू बागायतदार याकडे गांभीर्याने बघत नाहीत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात काजू या पिकाला दुय्यम स्थान मिळत असल्याचे दिसत आहे.

गेल्या पाच वर्षापूर्वी महाड, माणगाव, रोहा या तालुक्यात शासनाच्या कृषी विभागामार्फत छोट्या-छोट्या उद्योजकांना काजूगर उद्योग उभारणीसाठी अनुदान दिले होते. मात्र पुरेसे भांडवल नसल्यामुळे या उद्योग प्रक्रियेला खीळ बसली आहे. जिल्ह्यात काजू उत्पादन जानेवारी अखेरपासून ते मे महिन्यापर्यंत होते. मात्र ही उद्योग प्रक्रिया सरासरी मार्च ते डिसेंबर दहा महिन्यापर्यंत चालते.

एका टनामागे अडीशे किलो, काजूगर निव्वळ उत्पादन विक्रीसाठी मिळते. सध्या या काजुगरांचा एक हजार रुपये ते बाराशे रुपये सरासरी भाव बजारात किलोसाठी चालू आहे. हा उद्योग सुरु करण्यासाठी व उद्योजक सुशिक्षित बेरोजगार यांना शासनाने व बँकांनी विशेष भरीव अर्थसहाय्य दिल्यास रायगड जिल्ह्यात या व्यवसायाला भविष्यकाळात सुगीचे दिवस येतील व रायगड जिल्हा राज्याच्या व देशाच्या नकाशावर काजूगरांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply