कर्जत : बातमीदार
भारतीय जनता पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस म्हणून पंकज पुंडलिक पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंकज पाटील हे काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष पुंडलिक पाटील यांचे चिरंजीव आहेत.
पेण येथे काही दिवसांपुर्वी झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात कर्जत येथील युवक काँग्रेसचे कार्यकर्ते पंकज पाटील यांनी आपल्या अनेक सहकार्यांसह भाजपत प्रवेश केला होता. कर्जत भाजप मंडल बैठकीनंतर तालुका चिटणीस पदाची जबाबदारी पंकज पाटील यांच्यावर सोपविण्यात आली आहे. भाजपचे तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत यांनी पंकज पाटील यांना नियुक्तीपत्र दिले. त्यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, भाजप जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, कर्जतचे उप नगराध्यक्ष अशोक ओसवाल, ज्येष्ठ कार्यकर्ते राजाराम शेळके आदी उपस्थित होते.