Breaking News

नवोपक्रम स्पर्धेत कर्जत शिक्षण विभागाची बाजी

यु ट्यूब चॅनेल ठरतेय भारी

कर्जत : बातमीदार

तालुका शिक्षण विभागाच्या ’शिक्षण क्रांती’ यू ट्यूब चॅनलच्या कोरोना काळातील कामगिरीने राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण परिषद आयोजित राज्यस्तरीय नवोप्रकम स्पर्धेत भरारी घेतली आहे. या उपक्रमाने कर्जत तालुका राज्यात चौथ्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. गट शिक्षण अधिकारी संतोष दौंड यांच्या प्रयत्नाने तसेच उपक्रमशील शिक्षकांच्या सहकार्याने कर्जत तालुक्याला हा सन्मान प्राप्त झाला असून शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम बनला आहे.

मार्च महिन्यात कोरोना आल्यामुळे संपूर्ण देश लॉककडाऊन झाला, सगळ्यात जास्त नुकसान शालेय शिक्षण विभागाचे झाले, विद्यार्थ्यांना मिळणारे शिक्षण काही ठिकाणी ऑनलाइन पध्दतीने सुरू झाले. परंतु ज्या ठिकाणी नेटवर्क नाही तेथे काय करावे हा बर्‍याच पालकांना पडलेला प्रश्न होता. या काळातच कर्जतचे  गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांनी ‘डाएट‘ च्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यात तंत्रस्नेही शिक्षक हेरून त्यांच्या खांद्यावर ही जबाबदारी सोपवली आणि यातून कर्जत शिक्षण क्रांती या यू ट्यूब चॅनेल ची निर्मिती झाली. या चॅनेलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आशेचा किरण मिळाला व शिक्षण घराघरात पोहचले.

  विद्यार्थ्यांना कठीण वाटणारा समाजशास्त्र विषय  सहज सोपा करण्यासाठी डाएट च्या प्राचार्या चंद्रकला ठोके यांच्यासह अधिव्याख्याता आणि तंत्रस्नेही शिक्षक यांना सोबत घेऊन मैत्री भूगोलासी आणि सरावातून यशाकडे हा उपक्रम सुरू केला. 50हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा घेत विविध चाचण्या यशस्वीपणे सोडवल्या. 

या संपूर्ण यशामध्ये उपक्रमशील शिक्षिका ज्योत्स्ना बाक्रे (खडकवाडी शाळा), सारिका पाटील (शाळा-करवली वाडी), भाग्यश्री केदार (शाळा नौपाडा), जयश्री मोहिते (शाळा बेलवली, ता. पनवेल), अश्विनी थोरात (शाळा अंतराड वरेडी), सारिका रघुवंशी (आदई – पनवेल), श्रद्धा आंबूर्ले (चिंचवली, माणगांव), नम्रता पानसरे (अष्टमी शाळा-3, ता. रोहा), विद्या म्हात्रे (करंजाडे, ता. पनवेल), विभावरी सिंगासने (तळोजे पाचनंद, पनवेल), कुसुम हिंग (बोरिवली, कर्जत), प्रशांत दळवी, हरिश्चंद्र अडारी (कर्जत) या शिक्षकांचा समावेश आहे. एकूण 194 शिक्षक – शिक्षिकांनी या उपक्रमात भाग घेऊन उत्कृष्ट व्हिडीओ बनवून सादरीकरण केले आहे. तसेच पनवेल येथील जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे भूगोल सहाय्यक सोनल गावंड, तंत्रज्ञान विभागाचे  ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. संजय वाघ, तसेच राजेंद्र लठ्ठे, गणेश कुताळ, राकेश आहिरे यांनी जबाबदारी पार पाडली आहे.

या यशामुळे गुणवतेच्या बाबतीत 15 व्या स्थानी असणार्‍या कर्जत तालुक्याने चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या मुळे गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड यांच्यासह कर्जत तालुक्यातील शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी, सर्व केंद्रप्रमुख, तंत्रस्नेही शिक्षकांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Check Also

कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा

विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …

Leave a Reply