Breaking News

रेल्वे माथाडी कामगारांना मिळणार सुविधा

माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई ः बातमीदार
मध्य व पश्चिम रेल्वेच्या विविध माल धक्क्यावरील माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी विश्रांतीगृह, पिण्याच्या पाण्याची सोय, शौचालय, प्लॅटफॉर्म व रस्ते दुरुस्ती, दिवाबत्तीची सोय आदी सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांन मंत्रालयात झालेल्या बैठकित दिल्या.
विविध रेल्वे यार्डात पिण्याच्या पाणी, विश्रांतीगृह, शौचालय, प्लॅटफॉर्म व रस्ते दुरुस्ती आदी सुविधांचा अभाव असून, त्या सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी महाराष्ट्र माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने रेल्वे प्रशासन व कामगार मंत्री यांचेकडे निवेदन देऊन केली होती. त्यासंदर्भात गुरुवारी (दि. 20) कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती. त्या वेळी या सूचना केल्या.
या बैठकिस युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख, सेक्रेटरी कृष्णा पाटील, प्रशांत सणस, संजय चोरमले, महाराष्ट्र राज्याचे कामगार विभागाच्या प्रधान सचिव वनिता सिंघल, कामगार आयुक्त सतीश देशमुख, सह कामगार आयुक्त (माथाडी) व्ही. के. बुवा, मध्य रेल्वेचे सहाय्यक वाणिज्य प्रबंधक चंद्रकांत पगारे, मुंबई डिव्हीजनचे गुडस वाणिज्य निरिक्षक रामशंकर गुप्ता, चिफ कमिशनर व्ही. गोपी कृष्णा, जोगेश्वरी रेल्वे यार्डचे सीजीओ विश्वास गोसावी, पश्चिम रेल्वेचे निरिक्षक मनोज मिश्रा, ग्रोसरी बोर्डाचे चेअरमन बाळासाहेब वाघ, रेल्वे बोर्डाचे चेअरमन दिनेश दाभाडे, नागपूर सोलापूर विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त सु.म.गायकवाड, नागपूर माथाडी मंडळाचे अध्यक्ष राजदिप पूर्वसचिव एम.पी.मढवी, पुणे बोर्डाचे अध्यक्ष प्र.ब.जाधव, सहाय्यक कामगार आयुक्त स.र. तोटावार, जळगांव माथाडी बोर्डाचे अध्यक्ष चं.ना. बिराट, ट्रान्सपोर्ट बोर्डाचे सचिव सुर्यकांत डोबरियाल आदी अधिकारी उपस्थित होते.
चर्चेनंतर रेल्वे यार्डात आवश्यकत्या सुविधा उपलब्ध होण्याकरीता रेल्वे प्रशासन व संबंधितांनी तातडीने कार्यवाही करावी, जेणेकरून माथाडी कामगार व अन्य घटकांचे सुरु असलेले हाल संपुष्टात येतील अशा सूचना केल्या, त्याचबरोबर रेल्वे याडांतील क्लिअरींग एजंटकडून माथाडी कामगारांच्या कामाची लेव्हीसह मजूरी बोर्डात भरणा होण्याबद्दल लेव्हीसह मजूरी वसुल करण्याबद्दल माथाडी बोडांनी कारवाई करण्याच्या सूचनादेखील मंत्री महोदय यांनी दिल्या. याबद्दल या युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र पाटील व इतर पदाधिकार्‍यांनी आभार व्यक्त केले आहे.

 

Check Also

जितेंद्रशी आपला ‘परिचय’ असादेखील…

2001च्या मे महिन्यातील गोष्ट. तुषार कपूरचा रुपेरी पडद्यावरील पदार्पणातील ‘मुझे कुछ कहना है’च्या पूर्वप्रसिद्धीत रंग …

Leave a Reply